पंचवटी एक्स्प्रेसला मिळणार २१ नवीन बोगी रेल परिषदेचे यश : सर्व कोचेस अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:24 AM2017-12-18T01:24:28+5:302017-12-18T01:25:07+5:30

नाशिककरांची जिव्हाळ्याची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श ट्रेन बनविण्यासाठी रेल परिषदेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसचे सर्व २१ नवीन बोगींना मंजुरी मिळाल्याची माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी दिली.

Panchavati Express will get 21 new bogie train council success: All caches updated | पंचवटी एक्स्प्रेसला मिळणार २१ नवीन बोगी रेल परिषदेचे यश : सर्व कोचेस अद्ययावत

पंचवटी एक्स्प्रेसला मिळणार २१ नवीन बोगी रेल परिषदेचे यश : सर्व कोचेस अद्ययावत

Next
ठळक मुद्देविना तिकीट कोणी प्रवास करू नयेपत्रव्यवहार करून २१ नवीन बोगी देण्याची मागणी

नाशिकरोड : नाशिककरांची जिव्हाळ्याची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श ट्रेन बनविण्यासाठी रेल परिषदेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसचे सर्व २१ नवीन बोगींना मंजुरी मिळाल्याची माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी दिली.
पंचवटी एक्स्प्रेस वेळेवर पोहचावी, स्वच्छ बोगी असावी, विना तिकीट कोणी प्रवास करू नये, अनाधिकृत खाद्य विक्रेते नसावे व पंचवटीच्या सर्व समस्या दूर करून तिला आदर्श ट्रेन बनविण्यासाठी रेल परिषदेने सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. येत्या दोन महिन्यात पंचवटीच्या नवीन २१ बोगी येण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे परिषदेने पुणे-मुंबई धावणाºया डेक्कन क्वीनसाठी देखील नवीन रॅक मिळावा अशी मागणी केली आहे. रेल्वेमंत्री, मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी रेल परिषदेने पत्रव्यवहार करून पंचवटीच्या सर्व २१ नवीन बोगी देण्याची मागणी केली होती. मुंबई रेल्वेचे वरिष्ठ प्रवासी वाहतुक व्यवस्थापक डी.वाय. नाईक यांनी याबाबत रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रेल्वे बोर्डाने पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्व २१ नवीन बोग्या देण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वे परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी दिली.

Web Title: Panchavati Express will get 21 new bogie train council success: All caches updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.