पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:45 AM2019-04-16T00:45:38+5:302019-04-16T00:46:02+5:30

परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.

In Panchavati area, Dr. Babasaheb Ambedkar pictured procession | पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक

पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक

Next

पंचवटी : परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पेठरोड परिसरात चित्ररथ काढून तीन पुतळे येथे अभिवादन करण्यात आले.
मालेगाव स्टॅण्ड, पेठरोड, दत्तनगर, फुलेनगर, शनिमंदिर, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, आरटीओ कॉर्नर, मेरी, म्हसरूळ, जकात नाका, क्रांतिनगर, एरंडवाडी, मखमलाबादरोड, गौतम कॉलनी आदी परिसरात अभिवादन करण्यात आले. पेठफाटा येथून काढलेल्या मिरवणुकीत भीमसैनिकांनी ठेका धरला होता. शनिवारी सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पेठरोडहून निघालेल्या मिरवणुकीचा फुलेनगर तीन पुतळे येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे चित्ररथात ठेवण्यात आले होते. मिरवणुकीनंतर रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक शांता हिरे, जगदीश पाटील, पद्माकर पाटील, लक्ष्मण धोत्रे आदींसह भीमसैनिक संख्येने उपस्थित होते.
बँक आॅफ महाराष्ट्र आंचल कार्यालयात आंबेडकर जयंती
पंचवटी : बँक आॅफ महाराष्ट्र एससी एसटी अँड ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशन आणि बँक आॅफ महाराष्ट्र आंचल कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात साजरी करण्यात आली होते. या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून आंचल प्रमुख प्रफुल्ल पालीवाळ, माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर सोनकुसाळे, बँक आॅफ महाराष्ट्र संघटनेचे राजन भालेराव आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाथरकर, विनोद मौजे, राजन
भालेराव, मंगेश रोकडे, अमोल राजभोज, तुषार राजगुरू, रणजित शेवाळे, शिरीष जहागिरदार,
आदित्य तुपे, श्रीराम बोरसे, अशोक डोकफोडे, संतोष बागले, पवन डेरले, अमोल जाधव आदींसह बँक आॅफ महाराष्ट्र ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मखमलाबाद येथील ओम दुर्गा माता मित्रमंडळ
पंचवटी परिसरातील स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद येथील ओम दुर्गा माता मित्रमंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवाजी बर्गे, गणेश बानाईतकर, टी. जी. अहिरे, संदीप धात्रक, तुषार गांगुडे, आबा बांडे, स्वप्नील मानकर आदी उपस्थित होते.

Web Title: In Panchavati area, Dr. Babasaheb Ambedkar pictured procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.