भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:05 AM2018-12-16T01:05:31+5:302018-12-16T01:05:52+5:30

भांडण करणाऱ्या मद्यपीस समजावण्यासाठी गेलेल्या नातेवाइकावर मद्यपीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गंगापूररोडवरील डीकेनगर घडली़

On the other hand, it has gone to solve the problem | भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमावर वार

भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमावर वार

Next

नाशिक : भांडण करणाऱ्या मद्यपीस समजावण्यासाठी गेलेल्या नातेवाइकावर मद्यपीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गंगापूररोडवरील डीकेनगर घडली़ निर्मला कॉन्व्हेंटजवळील रहिवासी छोटू पहाडे राहतात़ त्यांच्या घराजवळ राहणारा नातेवाईक बंडू खरे हा मद्य पिऊन भांडण करीत असल्याने त्यास समजावण्यासाठी पहाडे गेले होते़ त्यास पहाडे यांचा राग आल्याने त्याने भाजी कापण्याच्या सुरीने त्याच्यावर वार केले़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गळफास घेऊन
एकाची आत्महत्या
नाशिक : घरातील खिडकीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़१३) अंबड येथील घरकुल योजनेमध्ये घडली़ राजू दशरथ नेटके (३२, रा. बिल्डिंग नंबर १४, घरकुल योजना, अंबड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: On the other hand, it has gone to solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.