मालेगावी शिवदर्शन सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:03 PM2018-02-09T23:03:31+5:302018-02-10T00:32:18+5:30

मालेगाव : येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे येत्या ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यशश्री कंपाउंडमध्ये शिवदर्शन व महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing Malegavi Shivsharshan Sankalp | मालेगावी शिवदर्शन सोहळ्याचे आयोजन

मालेगावी शिवदर्शन सोहळ्याचे आयोजन

googlenewsNext

मालेगाव : येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे येत्या ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यशश्री कंपाउंडमध्ये शिवदर्शन व महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत १२ ज्योतिर्लिंगम दर्शन सोहळा सादर केला जाणार असल्याची माहिती सेवा केंद्राच्या शकुंतला दीदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सकाळी दहा ते बारा व सायंकाळी पाच ते दहा या वेळेत भाविकांना हा दर्शन सोहळा बघता येणार आहे. याशिवाय श्रीकृष्ण जन्मदृश्य, लक्ष्मीनारायण- राजदरबार, स्वर्गाचा देखावा, कुंभकर्ण (१७ फूट उंचीची मूर्ती), व्यसनमुक्तीच्या प्रबोधनासाठी व्यसनरूपी अजगराची प्रतिकृती, राजयोग, सृष्टीचक्र आदींचे स्टॉल उभारले जाणार आहे. यासह ध्यानधारणेसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या शकुंतला दीदी, डॉ. मल्हार देशपांडे, डॉ. मनीषा कापडणीस आदींनी केले आहे.

Web Title: Organizing Malegavi Shivsharshan Sankalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.