वादळी पावसामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:38 AM2018-06-19T01:38:40+5:302018-06-19T01:38:40+5:30

शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नुकसान झाले.

Onion shredded due to windy rain | वादळी पावसामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त

वादळी पावसामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त

Next

कळवण : शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नुकसान झाले. तसेच भेंडी येथील मराठी शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान झाले आहे.  सोमवारी दुपारी कळवण शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. कळवण खुर्द येथील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांदा साठवणीचे दोन शेड जमीनदोस्त झाले. दोन्ही शेडमध्ये साठवून ठेवलेला १६०० क्विंटल कांदा पावसात भिजून जवळपास १५ लाख रु पयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे बोरदैवत परिसरातील शेकडो घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाले होते. तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे नुकसान झाले होते. शिवाय घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून शासनस्तरावरून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे. तहसीलदार चावडे यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जुनी बेज परिसरात पाऊस
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह जुनी बेज, नवी बेज, भादवण, विसापूर, गांगवण आदी परिसरात सोमवारी (दि. १८) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाºयासह पाऊस झाला. यात जुनी बेज येथील शेतकरी बाजीराव एकनाथ धनवटे यांच्या गांगवण शिवारातील कांदाचाळीचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेला २० ट्रॉली कांदा पावसात पूर्णत: भिजल्याने धनवटे यांचे मोठे नुकसान झाले आहे.  परिसरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली आहे. अर्धा तास झालेल्या या पावसात पाऊस कमी आणि वारा अधिक असल्याने कांदा चाळीचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाºयासह होणाºया पावसामुळे दरवर्षी शेतकºयांचे मोठे नुकसान होत असते. मात्र शासनाकडून पंचनामे होऊनही भरपाई मिळत नसल्याची तक्रार नंदकिशोर बच्छाव, सचिन पाटील, शीतलकुमार अहेर, संदीप पाटील, विवेक बच्छाव, दौलत बच्छाव, चिंतामन बच्छाव यांसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Onion shredded due to windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस