श्री राधा मदन गोपालजी मूर्तींवर एक टन पुष्पाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:51 AM2018-03-24T00:51:31+5:302018-03-24T00:51:31+5:30

द्वारका परिसरातील इस्कॉन कृष्ण मंदिरातील श्री राधा मदन गोपालजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी (दि. २३) सात वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित सोहळ्यात एक टन गुलाबाच्या फुलांसह अन्य पुष्पांचा अभिषेक करण्यात आला. अत्यंत मंगलमय आणि धार्मिक वातावरणात आयोजित या सोहळ्यासाठी मंदिरासह परिसराची सजावट करण्यात आली होती.

One tonne Pushparabhishek on Shri Radha Madan Gopalji idol | श्री राधा मदन गोपालजी मूर्तींवर एक टन पुष्पाभिषेक

श्री राधा मदन गोपालजी मूर्तींवर एक टन पुष्पाभिषेक

Next

नाशिक : द्वारका परिसरातील इस्कॉन कृष्ण मंदिरातील श्री राधा मदन गोपालजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी (दि. २३) सात वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित सोहळ्यात एक टन गुलाबाच्या फुलांसह अन्य पुष्पांचा अभिषेक करण्यात आला. अत्यंत मंगलमय आणि धार्मिक वातावरणात आयोजित या सोहळ्यासाठी मंदिरासह परिसराची सजावट करण्यात आली होती. यावेळी सायंकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात मुंबई येथील इस्कॉन मंदिर समितीचे अध्यक्ष गोविंद प्रभू यांच्या हस्ते सातव्या ब्रह्मोत्सवात एक टन पुष्पपाकळ्यांचा अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी गोपाल आनंद प्रभू हरिकीर्तन प्रभू, सहसशीर्ष प्रभू, भरत प्रभू, अंतरंग शक्ती माताजी, पूर्णशक्ती माताजी आदी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त सायंकाळपासून भजन, कीर्तन, पंचामृत अभिषेक प्रवचन, पुष्पाभिषेक महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
२०११ मध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अनुयायी असलेल्या इस्कॉन म्हणजे आंतरराष्टÑीय कृष्ण भावनामृत संघ या धार्मिक संस्थेच्या प्रचार कार्यास नाशिक शहरात १९९६ मध्ये प्रारंभ झाला. त्यानंतर २३ मार्च २०११ मध्ये द्वारका परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात श्री राधा मदन गोपालजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रीकृष्ण मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

Web Title: One tonne Pushparabhishek on Shri Radha Madan Gopalji idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक