पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:22 AM2018-09-12T02:22:38+5:302018-09-12T02:22:55+5:30

प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

One killed in swine flu in Panchavati | पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

Next

पंचवटी: प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मानेनगर येथे राहणाºया दिलीप माने यांना गेल्या आठवड्यात स्वाइन फ्लूची लागण झालेली होती. तपासणी केल्यानंतर माने यांना
स्वाइन फ्लू असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेला होता.
या प्रकारानंतर मनपा संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कळवूनदेखील त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नव्हती. याशिवाय माने यांना औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेले असतानाही संबंधित विभागाच्या कोणत्याही वैद्यकीय अधिकाºयांनी येऊन पाहणी केली नाही तसेच विचारपूसही केली नसल्याचा आरोप माने यांनी केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात माने यांच्यावर औषधोपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांचे उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. माने यांचा मृत्यू मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

Web Title: One killed in swine flu in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.