कानडगाव शिवारात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:55 PM2018-02-18T22:55:44+5:302018-02-18T22:58:15+5:30

चांदवड : तवेराची दुचाकीला धडकचांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात मनमाड-मालेगाव रोडवर तवेराचालकाने समोरून येणाºया मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

One killed in Kanagagaon Shivar | कानडगाव शिवारात एक ठार

कानडगाव शिवारात एक ठार

Next
ठळक मुद्देअज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल तवेराचालकाने घटनास्थळावरून पळ

चांदवड : तवेराची दुचाकीला धडकचांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात मनमाड-मालेगाव रोडवर तवेराचालकाने समोरून येणाºया मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मनमाड-मालेगाव रोडवर मनमाडकडे जाणाºया तवेरा कारवरील (क्र. एमएच १२ ईएम ८१०४) अज्ञात चालकाने समोरून येणाºया स्प्लेंडर मोटारसायकलला (क्रमांक एमएच ४१ झेड २८४८) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील आमीन मोहमंद हनीफ (२१) व अतिक अहमद नूरमोहमंद (३१), दोघे रा. मालेगाव हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आमीन मोहमंद हनीफ हा मरण पावला, तर अतिक अहमद नूरमोहमंद हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. तवेराचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One killed in Kanagagaon Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा