One of the injured in the riot at Rajapur was injured | राजापूर येथे हरणाच्या झुंजीत एक हरिण जखमी
राजापूर येथे हरणाच्या झुंजीत एक हरण जखमी.

ठळक मुद्देहरणाच्या शिंगाला लागल्याने ते जखमी झाले.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे सोयगाव रोडला घुगे वस्ती येथील विठ्ठल पाटीलबा घुगे यांच्या गट नंबर ५३२ शेतात दोन हरणाची झुंज होऊन एका हरणाच्या शिंगाला लागल्याने ते जखमी झाले.
घुगे यांनी राजापूर वनविभागाला फोन करून सदर माहीती दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदशनाने वनरक्षक गोपाळ हारगावकर व वनसेवक व्ही. एस. लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन हरणास ताब्यात घेतले, व पूढील उपचारासाठी येवला येथे नेले. तेथे पुढील उपचार करून जखमी हरणास राजापूर येथील कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना मच्छींद्र ठाकरे, मोतीराम घुगे, शांताराम घुगे, मनोज अलगट, सटवा घुगे आदी शेतकऱ्यांनी मदत केली, त्यामुळे या जखमी हरणाचा जीव वाचला.
 


Web Title: One of the injured in the riot at Rajapur was injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.