जुना उन्हाळ कांदा फेकला उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:56 PM2019-03-13T17:56:55+5:302019-03-13T17:57:26+5:30

जळगाव नेऊर : दुष्काळी परिस्थीतीत सरकार किमान उत्पादन खर्चावर आधारीत मुलभुत किंमत कांद्यास देईल या आशेवर बसलेला कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षी अत्यल्प दर असल्याने आज ना उदया कांदाचाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदा  शेवटी तोच कांदा उकिरड्यावर टाकला  व उन्हाळ कांदा पुन्हा बाजारभावा अभावी पुन्हा कांदाचाळीत साठविण्यास सुरूवात केली आहे.

Old Summer Onion Faded Up | जुना उन्हाळ कांदा फेकला उकिरड्यावर

साताळी येथे उन्हाळ कांद्याची सुरु असलेली काढणी

Next
ठळक मुद्देजळगाव नेऊर : नवीन कांद्याबाबत बाजार भावाची धास्ती

जळगाव नेऊर : दुष्काळी परिस्थीतीत सरकार किमान उत्पादन खर्चावर आधारीत मुलभुत किंमत कांद्यास देईल या आशेवर बसलेला कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षी अत्यल्प दर असल्याने आज ना उदया कांदाचाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदा  शेवटी तोच कांदा उकिरड्यावर टाकला  व उन्हाळ कांदा पुन्हा बाजारभावा अभावी पुन्हा कांदाचाळीत साठविण्यास सुरूवात केली आहे.

सुलतानी संकटाने बळीराजा ग्रासलेला असतांना या वर्षी तरी दुष्काळी परिस्थीतीत सरकार किमान उत्पादन खर्चावर आधारीत मुलभुत किंमत कांद्यास देईल या आशेवर बसलेला कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षी अत्यल्प दर असल्याने आज ना उदया कांदाचाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदयास चांगला भाव मिळेल व आपला कौटुंबिक खर्च भागेल ही आशा बाळगुन होता, पण बारा महिन्यांचा कालावधी उलटुनही कांदाचाळीत साठविलेला कांद्याला भाव न वाढल्याने विक्र ीच केला नाही व मिळणाऱ्या भावातुन खर्चही निघत नसल्याने, शेवटी तोच कांदा उकिरड्यावर टाकला व यावर्षी मात्र दुष्काळी परीस्थीतीतही कमी पाण्यावर, घरातील  सोन्याची दागीने गहाण ठेऊन कर्ज उचल करून कांदा लागवड व काढण्याची मजुरी, औषधे व रासायनिक खते वापरून पिकविलेली उन्हाळ कांदा पुन्हा बाजारभावा अभावी पुन्हा कांदाचाळीत साठविण्यास पुन्हा एकदा मोठ्यामनाने बळीराजाने सुरूवात केली असुन बायबाप सरकारने कांदयांस उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव न दिल्यास ग्रामिण भागातील शेतक-यांचा कणा मोडल्याशिवाय रहाणार नाही असी परीस्थीती कांदा उत्पादक शेतक-यांची झाली आहे

प्रतिक्रि या :-
दुष्काळी परीस्थीतीने होरपळलेल्या शेतक-यांच्या कांदा पिकास उत्पादन खर्चावर आधारीत प्रति क्विंटल दोन हजार रूपये हमी भाव दिल्यास मागील वर्षीचा तोटा भरून निघेल.
भाऊसाहेब कळसकर,कांदा उत्पादक शेतकरी,साताळी ता .येवला.
 

 

Web Title: Old Summer Onion Faded Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा