जुने नाशिकमधील तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:28 AM2018-08-21T01:28:24+5:302018-08-21T01:28:39+5:30

काझीगढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (काझीगढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 Old Nashik girl commits suicide | जुने नाशिकमधील तरुणीची आत्महत्या

जुने नाशिकमधील तरुणीची आत्महत्या

Next

नाशिक : काझीगढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (काझीगढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अपेक्षाने घरातील बेडरूममध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला़ ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ अपेक्षाचा नुकताच विवाह ठरलेला होता, मात्र तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही़ दरम्यान, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नाही.
इंदिरानगरमधून कारची चोरी
चार्वाक चौकातील भूपाली सोसायटीतील रहिवासी सलीम शेख यांची दीड लाख रुपये किमतीची चारचाकी (एमएच ४१, व्ही २९३०) चोरट्यांनी शनिवारी (दि़१८) सोसायटीच्या गेटजवळून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखळी चोरट्यास अटक
जेलरोडच्या कलानगर येथील तनिष्क पार्कमधील पंपिंगहाउसच्या कलेक्शन टँकमध्ये मोटर सोडण्यासाठी वापरली जाणारी पन्नास किलोची साखळी चोरणारा संशयित संतोष बागुल (२७, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा) व त्याच्या साथीदारास रंगेहाथ पकडण्यात आले़ पोलिसांनी बागुल यास अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदेगावातील इसमाची आत्महत्या
शिंदेगावातील गौतमनगर येथील रहिवासी संजय पांडुरंग जाधव (४९) यांनी घराजवळील पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

Web Title:  Old Nashik girl commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.