मोटारीच्या धडकेत वृद्ध ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:08 AM2019-05-15T01:08:29+5:302019-05-15T01:09:36+5:30

अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत.

Old man killed, three injured in auto rickshaw | मोटारीच्या धडकेत वृद्ध ठार, तिघे जखमी

मोटारीच्या धडकेत वृद्ध ठार, तिघे जखमी

Next
ठळक मुद्देचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सिडको : अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड लिंकरोडवरील रामकृष्णनगर येथे मंगळवारी (दि.१४) दुपारी अशोक ओंकार जाधव (६१, रा. धुळे ) हे त्यांच्या साडूची मुलगी सविता चव्हाण असे दोघे नगरसेवकाला भेटण्यासाठी जात होते. यावेळी समोरून भरधाव कार (एमएच २० डीजे ६९१३) येऊन अशोक जाधव यांना धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सविताही जखमी झाली. आपल्या हातून अपघात झाल्याचे कळताच वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने त्याने मोटारसायकलने जात असलेले निर्मल अशोक भुजबळ व विकास अशोक भुजबळ यांना धडक दिली तेदेखील जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून त्याने मोटार नाशिकरोडच्या दिशेने दामटविली. येथील उड्डाणपुलावर मोटार उभी करून चालकाने खाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहे .
पाठलाग व्यर्थ
घटना घडल्यानंतर परिसरात मोठा जमाव जमू लागल्याने घाबरलेल्या चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला पाहून गर्दीतूनच चालकाने गाडी दामटविण्याचा प्रयत्न केल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले. काहींनी गाडीचा पाठलाग केला, मात्र चालक पळून गेला.

Web Title: Old man killed, three injured in auto rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.