पुर्व विभागीय कार्यालयाचा कोंडला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 05:19 PM2018-12-07T17:19:05+5:302018-12-07T17:20:25+5:30

नाशिक :शहरातील गजबजलेल्या मेनरोडवरील दगडी इमारतीमध्ये महापालिकेच्या पुर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याची वारंवार चर्चा होते मात्र अजूनही नूतन इमारतीबाबत ...

nsk,divisional,offic,conductor,breathing | पुर्व विभागीय कार्यालयाचा कोंडला श्वास

पुर्व विभागीय कार्यालयाचा कोंडला श्वास

googlenewsNext

नाशिक:शहरातील गजबजलेल्या मेनरोडवरील दगडी इमारतीमध्ये महापालिकेच्या पुर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याची वारंवार चर्चा होते मात्र अजूनही नूतन इमारतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. जीर्ण झालेली इमारत, पार्कींगची अपुरी सुविधा आणि इमारतीसमोर असलेले अतिक्रमण याबाबींचा विचार करता पुर्व विभागासाठी नूतन इमारत उभी राहाणे आवश्यक आहे. परंतु या इमारतीमध्ये सभा आणि कामानिमित्त येणाऱ्या नगरसेवकांकडून याबाबतचा पाठपुरावाच केला जात नसल्यामुळे शहरातील इतर सर्व विभागीय कार्यालयापेक्षा पूर्व विभागाचे कार्यालय अत्यंत अडचणीचे ठरत आहे.
पूर्व विभागाचे मेनरोड येथील कार्यालय कर्मचारी आणि नागरिकांच्याही दृष्टीने अत्यं गैरसोयीचे ठरत असून द्वारका सर्कल लगत मध्यवर्ती ठिकाणी पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापांसून केली जात आहे. मात्र त्याकडे कुणीही गांभिर्याने पाहत नसल्याने पुर्व विभागात येणारे नगरसेवक आणि नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूर्ण प्रभागात १४,१५,१६,२३ व ३० असे एकूण पाच प्रभाग येतात. यामध्ये जुने नाशिक द्वारका इंदिरानगर डीजीपीनगर क्रमांक एक विनयनगर, साईनाथनग, राजीवनगर, गांधीनगर यासह विविध उपनगरे आहेत. प्रभागातील नागरिकांना जन्म - मृत्यू दाखला यासाठी मेनरोड येथील कार्यालयात यावे लागते. जुने नाशिक परिसरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी सुद्धा जावे लागते.

 

Web Title: nsk,divisional,offic,conductor,breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.