मतदार जागृतीसाठी आता घंटागाडीवर गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:13 AM2018-09-27T01:13:21+5:302018-09-27T01:14:10+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याबरोबरच, नवीन मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दिल्या.

 Now alarm clock for voter awareness | मतदार जागृतीसाठी आता घंटागाडीवर गजर

मतदार जागृतीसाठी आता घंटागाडीवर गजर

Next

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याबरोबरच, नवीन मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दिल्या. मतदार जागृतीसाठी आता शहरात कचरा गोळा करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडीवरून गजर करण्याची नवीन कल्पना आयोगाला सुचविण्यात आली.  निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत केल्या जात असलेल्या कार्यवाहीचा बुधवारी अश्विनकुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी व ज्या विधानसभा मतदारसंघात काम कमी झाले आहे, अशा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात नाशिकचाही समावेश होता. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबविण्याबरोबरच त्यासाठी विविध संकल्पना राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिवाय नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्यात यावी,  सर्व मतदारांची छायाचित्रे गोळा करावीत, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्यात यावी, प्रत्येक घरोघरी जाऊन बीएलओंनी भेटी देऊन माहिती अद्ययावत करावी आदी सूचना त्यांनी दिल्या. सरकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाºया रहिवाशांची मतदार नोंदणी करण्याची जबाबदारी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांवर सोपविण्याच्या निर्णयाची आठवणही त्यांनी करून दिली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार निबंधकांची मदत घेण्याचे सांगण्यात आले. मतदार जागृतीबाबत काय संकल्पना राबविल्या गेल्या याचा आढावाही अश्विनकुमार यांनी घेतला. नाशिक शहरातील मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दररोज प्रत्येक गल्ली, चौकातून कचरा गोळा करणाºया महापालिकेच्या घंटागाडीद्वारे गजर करण्याची कल्पना नाशिक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी मांडल्याने त्यास मान्यता देण्यात आली.
मशिदींमध्ये करणार प्रचार
नाशिक शहरातील मशिदींमध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी मुस्लीम धर्मीयाकडून विशेष नमाजपठण केले जाते. या नमाजपठणासाठी सर्वच उपस्थित असतात, त्यामुळे नेमके त्याच वेळी मशिदींमध्ये जाऊन धर्मगुरू, मौलानांकरवी मुस्लीम मतदारांची नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल खात्यातील काही मुस्लीम कर्मचारी, अधिकाºयांची मदत घेण्याचेही ठरविण्यात आले आहे.

Web Title:  Now alarm clock for voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.