पाणीपट्टी थकविणाऱ्या  ३३ हजार नागरिकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:58 AM2019-03-28T00:58:31+5:302019-03-28T00:58:49+5:30

महापालिकेने मार्च अखेरीमुळे थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, पाणीपट्टी थकविणाऱ्या ३३ हजार नागरिकांना नोटिसा बजावल्या आहे, तर दोनशे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

 Notice to 33,000 people who are tired of water tank | पाणीपट्टी थकविणाऱ्या  ३३ हजार नागरिकांना नोटिसा

पाणीपट्टी थकविणाऱ्या  ३३ हजार नागरिकांना नोटिसा

Next

नाशिक : महापालिकेने मार्च अखेरीमुळे थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, पाणीपट्टी थकविणाऱ्या ३३ हजार नागरिकांना नोटिसा बजावल्या आहे, तर दोनशे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
जकात पाठोपाठ एलबीटी संपुष्टात आल्याने महापालिकेच्या दृष्टीने घरपट्टी आणि पाणीपट्टी यावरील खर्च भरून काढण्यासाठी परिश्रम करावे लागत आहे. महापालिकेने कधी नव्हे एवढे लक्ष घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागावर केंद्रित केले आहे. घरपट्टीत गेल्या वर्षी महापालिकेने वाढ केली तसेच वार्षिक भाडे मूल्यातदेखील वाढ केली आहे. तथापि, विरोधामुळे अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट दीडशे कोटी रुपयांवर आणूनही ते पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. महापालिकेने आत्तापर्यंत १०९ कोटी रुपये वसूल केले असून, आणखी सहा कोटी रुपये वसूल होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, महापालिकेने पाणीपट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असून, आत्तापर्यंत ३३ हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत, तर दोनशे जणांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. ३१ मार्चपर्यंत बड्या थकबाकीदारांच्या विरोधात धडक मोहीम सुरूच राहणार असून, आणखी काही थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता महापालिक ा सूत्रांनी वर्तविली आहे.
आता महापालिकेचे नाव लागणार
महापालिकेने दीड हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात कर न भरणाºया मिळकतींचा प्रतिवर्षाप्रमाणेच लिलाव करण्यात येणार असून, लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यास महापालिकेचे नाव लावण्यात येणार आहे. गेल्यावर्षी स्थायीत यासंदर्भातील ठरावदेखील झाला आहे.

Web Title:  Notice to 33,000 people who are tired of water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.