नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:23 AM2018-02-17T02:23:14+5:302018-02-17T02:23:28+5:30

देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.

 The note-offs were held by ordinary people | नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

Next

येवला : देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.  येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फसव्या सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार सुळे यांनी सरकारवर विविध धोरणे आणि मुद्द्यांवरून घणाघाती हल्ला चढवला. येवल्यातील शनि पटांगण संपूर्ण भरले होते. खासदार सुळे म्हणाल्या, हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि जनतेला दु:खाच्या खाईत लोटण्यासह राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूड उगवत आहे. भुजबळ यांच्यावर २२ महिने अन्याय करणाºया सरकारला नियती व जनता कधीच माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.
‘महाराष्ट्रात कॉपी जमणार नाही’
डिजिटल इंडियामागे धावणे बंद करा, असे आवाहन करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुजरातमध्ये भाजपा कॉपी करून पास झाले. जनतेलाच अडचणीत आणणाºया भाजपा सरकारला महाराष्ट्रात जनता कॉपी करू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
च्महाराष्टÑाचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श आणि शिकवण जमेल तेवढे करा, जमेल तेच जनतेला सांगा, यावर आम्ही वाटचाल करणार आहोत. उगीच फसवणूक करण्याचा आपला धर्म नाही. ही शिकवण घेऊन राष्ट्रवादी काम करीत आहे. भाजपासारखी जनतेची दिशाभूल करीत सत्ता मिळवण्याची आमची संस्कृती नाही. सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे सरकार जनताच खाली खेचेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

Web Title:  The note-offs were held by ordinary people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.