निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या छाटणीपूर्व मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:55 PM2018-09-13T17:55:24+5:302018-09-13T17:56:02+5:30

द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या छाटणीपूर्व कलम करण्याच्या कामांना वेग आला आहे. उगाव, वनसगाव, शिवडी, खेडे, सारोळे, खडकमाळेगांव, नैताळे, सावरगांव, रानवड, पालखेड, दावचवाडी या प्रमुख द्राक्ष उत्पादक गावात सध्या छाटणीपुर्व मशागतीला वेग आला आहे तर तुरळक प्रमाणात काही ठिकाणी छाटणीही सुरु झाली आहे.

In the Niphad taluka, the speed of pre-release cultivation | निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या छाटणीपूर्व मशागतीला वेग

निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या छाटणीपूर्व मशागतीला वेग

googlenewsNext

द्राक्षपंढरीतील गावांबरोबरच एरवी पानथळ परिसर असलेल्या गोदाकाठच्या शिंगवे, सोनगांव, कोठुरे, करंजगांव, पिंपळगांव, निपाणी या भागातील युवा शेतकरी वर्गदेखील द्राक्ष पिकाकडे वळत आहे. गेल्या पाच सहा वर्षात द्राक्ष लागवडीसाठी बंगलोरच्या रोपांना मागणी वाढली आहे. अनेक वर्षापासुन द्राक्षवेलीच्या कलमांसाठी पारंपरिक जातीच्या कलमांना प्राधान्य दिले जात होते मात्र अलिकडच्या काळात स्वत: द्राक्ष उत्पादकांनी आपली संशोधन वृत्ती वापरत नवनवीन वाण विकसित केले आहेत. सांगली, सोलापूरकडील द्राक्ष बागायतदारांनी या संशोधनात आघाडी घेतली आहे.
कलमगीरीसाठी कृषी विद्यापीठातील कामगारांना प्राधान्य
निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक गावांत सध्या द्राक्षबागांच्या कलम भरण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठात प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांचे गट दाखल झाले आहेत. त्यांना प्राधान्य देण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. प्रती वेल दोन कलम भरण्यासाठी चार ते पाच रु पये दर दिले जात आहेत.

Web Title: In the Niphad taluka, the speed of pre-release cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती