‘निपाह’: शहरात विशेष दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:08 AM2018-05-24T01:08:53+5:302018-05-24T01:08:53+5:30

केरळमध्ये नव्याने आढळलेल्या निपाह विषाणूमुळे अनेकांचे बळी गेल्याने नाशिकमध्ये देखील याबाबत दक्षता घेण्यास प्रारंभ झाला असून, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेने कथडा रुग्णालयात विशेष विलगीकरण कक्ष स्थापित केला आहे,

'Nipah': Special skill in the city | ‘निपाह’: शहरात विशेष दक्षता

‘निपाह’: शहरात विशेष दक्षता

googlenewsNext

नाशिक : केरळमध्ये नव्याने आढळलेल्या निपाह विषाणूमुळे अनेकांचे बळी गेल्याने नाशिकमध्ये देखील याबाबत दक्षता घेण्यास प्रारंभ झाला असून, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेने कथडा रुग्णालयात विशेष विलगीकरण कक्ष स्थापित केला आहे, तर विषाणूंची लागण झालेला रुग्ण आढळल्यास जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील कक्ष सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.  केरळमधील कोळीकोड येथे निपाह या भारतीयांना नव्याने ज्ञात झालेल्या विषाणूंमुळे काहींचा बळी गेल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. विशेषत: हा रोग संसर्गजन्य असल्याने केरळातून नाशिकमध्ये कोणी दाखल झाल्यास संसर्ग वाढू शकते अशी धास्ती आहे. स्वाइन फ्लू या आजाराबाबतदेखील अशाच प्रकारे बाहेरून नाशिकमध्ये दाखल झालेल्यांमुळे संसर्ग वाढला होता. दरम्यान, निपाहच्या प्रसाराबद्दल जोरदार चर्चा सुरू नागरिक धास्तावले आहेत. काहींनी सुटीतील केरळ सहली रद्द केल्या आहेत. केरळमधील नागरिकही  आपल्या आप्तेष्टांच्या आरोग्याबाबत चिंतित आहेत. या आजाराचा संभाव्य शिरकाव टाळण्यासाठी काही खासगी प्रवासी बस कर्नाटकातच सीमेवर रोखण्यात आल्या आणि प्रवाशांची तपासणी करूनच पुढे येऊ देण्यात आल्याचे वृत्त आहे. या संभाव्य आरोग्य संकटाबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जुुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला आहे.  ४याशिवाय वटवाघळांमुळे हा विषाणू पसरत असला तरी या पक्ष्याची विष्ठा खाणाºया डुकरांमुळेही संसर्ग होऊ शकत असल्याने पशुवैद्यकिय विभागाला डुकरांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 'Nipah': Special skill in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.