पाणथळ जमिनीचे रक्षण करण्याची गरज : गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:38 AM2019-04-29T00:38:41+5:302019-04-29T00:39:17+5:30

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले.

 Need to protect the wetlands: Gogate | पाणथळ जमिनीचे रक्षण करण्याची गरज : गोगटे

पाणथळ जमिनीचे रक्षण करण्याची गरज : गोगटे

Next

नाशिक : ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले. ‘नांदूरमधमेश्वर : एक परीक्षण’ या विषयावर स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्र म संपन्न झाला.  याप्रसंगी गोगटे यांनी याप्रसंगी ग्लोबल वॉर्मिंग, रामसर कन्व्हेंशन, नांदूरमधमेश्वर अभयारण्य, पक्षी वैविध्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. कार्यक्रमास प्रमोद पुराणिक, दिगंबर गाडगीळ, मधुकर जगताप, सुनील वाडेकर, रवी वामनाचार्य आदी उपस्थित होते.
लोकसहभाग हवा
गोगटे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, शासकीय यंत्रणा, शासन, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून संरक्षण व संवर्धन होऊ शकते. त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्याची गरज आहे. आजकाल पाणी, जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title:  Need to protect the wetlands: Gogate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.