मानोरी परिसरात पावसाने पिकांना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 07:25 PM2019-07-20T19:25:25+5:302019-07-20T19:25:36+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.

Navsanjivani rains crop up in Manori area | मानोरी परिसरात पावसाने पिकांना नवसंजीवनी

मानोरी परिसरात पावसाने पिकांना नवसंजीवनी

Next
ठळक मुद्दे शेतात कामकरणारे शेतकरी आणि महिला वर्गांची मोठी धावपळ उडाली होती.

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी (दि.२०) दुपारी मध्यम पावसाने कमबॅक केल्याने मका, सोयाबीनच्या पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे. सकाळ पासूनच उन्हाची तीव्रता नेहमी पेक्षा जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात दमट वातावरण होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्याने विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. यावेळी शेतात कामकरणारे शेतकरी आणि महिला वर्गांची मोठी धावपळ उडाली होती.
मका, सोयाबीन निंदणीची सुरू असलेली कामे पावसामुळे अर्ध्यावर सोडून शेतकरी घरी परतले होते. यंदा येवला तालुक्यातील पश्चिम भागात समाधान कारक हा वेळेत पाऊस पडत असल्याने निंदणी, खुरपणी देखील मोठ्या हौशेने सुरू असून अमेरिकन लष्करी अळीमुळे मात्र शेतकभयभित झाले आहेत.
गत वर्षी दुष्काळाशी सामना करून यंदा लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची अवस्था जणू आगीतून सुटून फोफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. मानोरी, पिंपळगाव लेप, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, जळगाव नेऊर आदी परिसरात शेतकरी लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी मक्याला महागडी औषधे फवारणी करत आहेत. आत्तापर्यंत दोनदा औषध फवारणी केली असून काही ठिकाणी अळी जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा दमदार पाऊस पडूनही मका हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Navsanjivani rains crop up in Manori area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस