नेवरगावी आगीत संसार भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:51 PM2019-04-28T18:51:51+5:302019-04-28T18:52:20+5:30

येवला : तालुक्यातील नेवरगाव येथे मेळन या आदिवासी वस्तीत घरगुती गॅसमुळे लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह चार पोते धान्य, दहा कोंबड्या तसेच रोख ५० हजार रुपये व कागद पत्रे जळून खाक झाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सदर घटना घडली.

 Navaragavi fire burns the world | नेवरगावी आगीत संसार भस्मसात

नेवरगावी आगीत संसार भस्मसात

Next

नेवरगाव येथील मेळन या आदिवासी वस्तीत गंगाधर बाळा सोनवणे यांचा परिवार वास्तव्यास होता. मोलमजुरी हेच या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांना शासनाच्या उज्वला योजने अंतर्गत घरगुती गॅसचा लाभ मिळाला होता. शनिवारी कुटुंबप्रमुख गंगाधर सोनवणे, पत्नी अलका, मुले बाबासाहेब व राहुल हे चारही सदस्य मजुरीच्या कामावर असताना सायंकाळी गॅसमुळे घराला आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य, दहा कोंबड्या, रोख पन्नास हजार रुपये व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीमुळे हा परिवार उघड्यावर आला आहे. पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, नवनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य छगन आहेर, माजी सरपंच उद्धव बोराडे, अरुण पेंढारे, अनिल कदम, पोलिस पाटील श्रावण बोराडे, भरत गडाख, शरद गडाख यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. सायंकाळी उशीरापर्यंत घटनेचा पंचनामा झालेला नव्हता.

Web Title:  Navaragavi fire burns the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग