राष्ट्रवादीचा महापालिकेवर ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:34 AM2018-09-11T01:34:36+5:302018-09-11T01:34:56+5:30

नाशिककरांवर लादलेली भरमसाठ करवाढ रद्द करावी, सिडकोमधील घरे उद््ध्वस्त करू नये, गावठाण भागात क्लस्टर विकास योजना राबवावी, अंगणवाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, झोपडपट्टीच्या ठिकाणी राहत्या घरी घरकुले द्यावी, महापालिकेने शहर बससेवेचा चालविण्याचा भार उचलू नये, अशा सहा मागण्यांसाठी सोमवारी (दि.१०) राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

Nationalist Congress Party's 'Attacking' | राष्ट्रवादीचा महापालिकेवर ‘हल्लाबोल’

राष्ट्रवादीचा महापालिकेवर ‘हल्लाबोल’

Next

नाशिक : नाशिककरांवर लादलेली भरमसाठ करवाढ रद्द करावी, सिडकोमधील घरे उद््ध्वस्त करू नये, गावठाण भागात क्लस्टर विकास योजना राबवावी, अंगणवाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, झोपडपट्टीच्या ठिकाणी राहत्या घरी घरकुले द्यावी, महापालिकेने शहर बससेवेचा चालविण्याचा भार उचलू नये, अशा सहा मागण्यांसाठी सोमवारी (दि.१०) राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांनीही मोर्चेकऱ्यांसमवेत पायी मार्गक्रमण करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना हुकूमशाही कारभार थांबविण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला.  मुंबईनाका येथील राष्टÑवादीच्या कार्यालयापासून भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, भुजबळ यांनी शिष्टमंडळासह मुंढे यांची भेट घेणे पसंत के ले नाही. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह शिष्टमंडळाने तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन वरील मागण्यांचे निवेदन दिले व त्यांच्यासमवेत चर्चा केली; मात्र मुंढे यांनी त्यांच्या सर्व मागण्यांबाबतचा खुलासा करत कुठल्याहीप्रकारे बेकायदेशीर काम महापालिका प्रशासनाकडून केले जात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची करवाढ अत्यंत कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.  यावेळी राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भुजबळ यांनी उपस्थित शेकडो मोर्चेकºयांना उद्देशून बोलताना सर्वप्रथम मुंढे यांच्या कारभाराचा समाचार घेतला. त्यानंतर भाजपा आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, अंगणवाड्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यात कोठेही उद्भवलेला नाही. मुंढे यांनी शहरातील अंगणवाड्या बंद करून अंगणवाडीसेविकांचा उदरनिर्वाह अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. त्यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना मान देत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे. नगरसेवकांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न मुंढे यांनी करू नये, असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला. सर्वांना सोबत घेऊन लोकशाही पद्धतीने नाशिककरांच्या विकासासाठी निर्णय घ्याल तर स्वागत करू, असे भुजबळ यावेळी म्हणाले.

Web Title: Nationalist Congress Party's 'Attacking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.