राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:57 PM2018-02-10T23:57:23+5:302018-02-11T00:42:38+5:30

चांदवड : तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्टÑीय लोकन्यायालय संपन्न झाले.

National Tribal Releases: 4015 Recovery Of Recovery Of Recovery Of 15 Crore 15 Lakhs | राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली

राष्टÑीय लोकन्यायालय : ४०१५ प्रकरणे निकाली एक कोटी १५ लाखांची वसुली

googlenewsNext
ठळक मुद्दे ७४ प्रकरणामध्ये तडजोडकर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित

चांदवड : चांदवड येथे नाशिक जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती चांदवड व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्टÑीय लोकन्यायालय संपन्न झाले.या लोकन्यायालयात तीन पॅनल ठेवण्यात आले होते.
पॅनल नंबर एक मध्ये न्यायमुर्ती के.जी.चौधरी,पॅनल नंबर दोन मध्ये न्यायमुर्ती एस.एस. धपाटे , पॅनल नंबर तीन मध्ये न्यायमुर्ती एस.पी. कुलकर्णी यांनी काम बघीतले. पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड. डी.आर.गांगुर्डे, अ‍ॅड. पी.पी. पवार, अ‍ॅड. पी.एस. कोतवाल, अ‍ॅड. एस. एन.पानसरे, अ‍ॅड. ए. एस. थोरमिसे, अ‍ॅड. कल्पना निबांळकर या विधीतज्ञांनी काम पहिले. या राष्टÑीय लोक न्यायालयामध्ये एकूण २४७ दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७४ प्रकरणामध्ये तडजोड झाल्याने निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड . दिनकर ठाकरे, अ‍ॅड. बी.जी.पटेल, अ‍ॅड. केशरचंद पाटणी, अ‍ॅड. शिवाजी सोनवणे, अ‍ॅड.पंडीतराव चव्हाण, अ‍ॅड. विनायक घुले, वकील संघाचे सर्व सदस्य, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहीते, वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, विस्तार अधिकारी, सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषदेचे कर्मचारी , पोलीस कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: National Tribal Releases: 4015 Recovery Of Recovery Of Recovery Of 15 Crore 15 Lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.