सर्व्हर बंदमुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे रखडले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:24 PM2018-01-31T19:24:01+5:302018-01-31T19:37:06+5:30

शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही.

 nashik,school,teachar,sarver,dowen,salary | सर्व्हर बंदमुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे रखडले वेतन

सर्व्हर बंदमुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे रखडले वेतन

Next
ठळक मुद्देशिक्षक अडचणीत : जिल्ह्यातील ५० टक्के शाळांना प्रतीक्षा गेल्या १० जानेवारीपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड

नाशिक : शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही. त्यामुळे शिक्षकांचे जानेवारीचे वेतन निघाले नसून सर्व्हर कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाच्या आॅनलाईन प्रणालीवर वेतनाची माहिती अपलोड करावी लागते. या शालार्थ प्रणालीमध्ये शाळांना आपल्या शिक्षकांची वेतनबीले सादर करावी लागतात. मात्र गेल्या १० जानेवारीपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले वेतनपथकाला सादर होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे हीच प्रणाली जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागात असून त्यावरच वेतनपथकाला माहिती भरावी लागत असल्याने त्यांच्याही कामाचा खोळंबा होऊन बसला आहे. जानेवारीच्या १ ते ९ तारखेपर्यंत ज्या शाळांनी माहिती पाठविली होती. त्यातील काही शाळांची वेतनबीले मंजूर होऊन शिक्षकांना पगार देखील झालेले आहेत. परंतु दुसºया टप्प्यातील वेतनाची माहितीच आॅनलाईन भरता येत नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
नाशिक जिल्ह्यात खासगी प्राथमिक अनुदानित शााळांची संख्या २२५ असून माध्यमिक अनुदानित शाळांची संख्या ७६४ इतकी आहे. या शाळांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांचे वेतन काढावे लागते. सुमारे ५० टक्के शाळांनी आॅनलाईन माहिती भरली असून उर्वरित ५० टक्के शाळांची माहिती अद्यापही अपलोड होऊ शकलेली नाही. त्यामुळे जानेवारीतील वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात आता काही शिक्षक संघटनांकडून माहिती घेण्याचे काम सुरू असून या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांची  भेट घेणार असल्याचे समजते.

Web Title:  nashik,school,teachar,sarver,dowen,salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.