चेंबर्सच्या अध्यक्षपदी नाशिकच्या संतोष मंडलेचा यांची निवड

By admin | Published: April 23, 2017 01:47 AM2017-04-23T01:47:07+5:302017-04-23T01:47:45+5:30

सातपूर : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले संतोष मंडलेचा यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड होणार आहे.

Nashik's Santosh Mandalay elected as chairman of the Chamber | चेंबर्सच्या अध्यक्षपदी नाशिकच्या संतोष मंडलेचा यांची निवड

चेंबर्सच्या अध्यक्षपदी नाशिकच्या संतोष मंडलेचा यांची निवड

Next

 सातपूर : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजच्या अध्यक्षपदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले संतोष मंडलेचा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असून, याची अधिकृत घोषणा सोमवारी (दि. २४) करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले आणि नाशिक येथील रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे संचालक संतोष मंडलेचा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या विरोधात चेंबरचे माजी अध्यक्ष असलेल्या नाशिकच्याच एका उद्योजकाने उमेदवारी दाखल केली होती.
परंतु शनिवारी (दि. २२) उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मंडलेचा यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची सोमवारी (दि. २४) अधिकृतरित्या बिनविरोध निवड घोषित करण्यात येणार आहे. तर उपाध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने मतदान होण्याची शक्यता असून, मतदानाची तारीख सोमवारी अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Nashik's Santosh Mandalay elected as chairman of the Chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.