nashik,Police,rescued,slaughtered,animals | पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका
पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका

ठळक मुद्दे पाच जनावरांची सुटका ; प्राणिसंरक्षण कायद्यान्वये गुन्हे

नाशिक : पिकअप वाहनातून कत्तलीसाठी नेत असलेल्या पाच जनावरांची नाशिकरोड पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) सुटका केली़ या प्रकरणी अश्पाक उस्मान शेख (३०, रा. विनयनगर रोड, भारतनगर, नाशिक) व अल्लाउद्दीन शेख सिकंदर (१८, रा. वडाळागाव) या दोघांविरोधात प्राणिसंरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिंदे टोलनाक्यावर पिकअप वाहनामध्ये (एमएच १५ ईजी ८८९८) जनावरे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले़ त्यानुसार वाहनाची तपासणी केली असता पाच जनावरे कोंबून भरल्याचे दिसले़ या पिकअपमधील संशयित शेख व सिकंदर या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले़

पोलिसांनी हे पिकअप वाहन जप्त घेऊन जनावरांची सुटका केली़ या प्रकरणी दीपक राक्षे (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

 


Web Title:  nashik,Police,rescued,slaughtered,animals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.