पत्नी, सासरच्या छळास कंटाळून पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:48 PM2018-07-15T17:48:20+5:302018-07-15T17:52:05+5:30

नाशिक : पत्नी व सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून पंचवटीतील २९ वर्षीय पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ श्रवण सनत जोशी (वय २९, रा़ जाधव भुवन, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील त्याच्या पत्नीसह सासरच्यांकडील सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

nashik,Husband,suicides,after,wife,harrashment | पत्नी, सासरच्या छळास कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नी, सासरच्या छळास कंटाळून पतीची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे मोबाइलवर सतत शिवीगाळ करून मानसिक छळ ११ लाख रुपयांची मागणी

नाशिक : पत्नी व सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून पंचवटीतील २९ वर्षीय पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ श्रवण सनत जोशी (वय २९, रा़ जाधव भुवन, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील त्याच्या पत्नीसह सासरच्यांकडील सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

चंदा सनत जोशी (वय ६०, रा़ जाधव भुवन, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा श्रवण याने ३ जुलै रोजी विषप्राशन करून आत्महत्त्या केली़ ११ जून २०१८ ते २ जुलै २०१८ या कालावधीत त्यांची सून मोहिनी हिने माहेरकडील नातेवाईक संशयित बिपीन बाबुलाल पंड्या, मनोज बाबुलाल पंड्या, संजय बाबुलाल पंड्या, बाबुलाल पंड्या, चंद्रिकाबेन विजय पंड्या, चेतनाबेन मनोज पंड्या (सर्व रा. राजकोट, गुजरात) यांच्याशी संगनमत करून मुलगा श्रवण व आपल्या मोबाइलवर फोन करून सतत शिवीगाळ करून मानसिक छळ केला़ तसेच राजकोट येथील न्यायालयात मुलास वारंवार चकरा मारायला लावून ११ लाख रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्याने न्यायालयात तक्रार करून मुलगा श्रवण यास आत्महत्येस प्रवृत्त केले़

सून मोहिनी व सासरच्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच मुलाने आत्महत्या केल्याचे जोशी यांनी फिर्यादित म्हटले आहे़

Web Title: nashik,Husband,suicides,after,wife,harrashment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.