जनगणनेच्या नावाखाली पाऊण लाखाच्या दागिण्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:26 PM2018-02-16T15:26:04+5:302018-02-16T15:32:30+5:30

नाशिक : जनगणनेच्या नावाखाली आलेल्या दोघा भामट्यांनी घरातील वृद्धेच्या मुलाची ओळख सांगत घरातील सुमारे पाऊण लाखाचे दागिने चोरून नेल्याची घटना दिंडोरी रोडवरील अमृतकुंभ सोसायटीत घडली़

nashik,fake,census,employee,gold,theft | जनगणनेच्या नावाखाली पाऊण लाखाच्या दागिण्यांची चोरी

जनगणनेच्या नावाखाली पाऊण लाखाच्या दागिण्यांची चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देदिंडोरी रोडवरील गीतानगर परिसरातील घटना ७७ हजार रुपयांचा ऐवज नेला चोरून

नाशिक : जनगणनेच्या नावाखाली आलेल्या दोघा भामट्यांनी घरातील वृद्धेच्या मुलाची ओळख सांगत घरातील सुमारे पाऊण लाखाचे दागिने चोरून नेल्याची घटना दिंडोरी रोडवरील अमृतकुंभ सोसायटीत घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी रोडवरील गीतानगर परिसरात अमृतकुंभ सोसायटी असून येथील वशिष्ट बंगल्यात दीपक देवराम वाळके हे शिक्षक आपल्या नव्वद वर्षीय आईसोबत राहतात़ वाळके यांची नोकरी बाहेरगावी असल्याने दिवसभर त्यांची आई घरी एकटीच असते तसेच त्यांच्या आईची दृष्टीही कमजोर आहे़ गुरुवारी (दि़१५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दोन संशयित आले व त्यांनी वाळके सर आमच्या ओळखीचे असून आम्ही जनगणनेच्या कामासाठी आल्याचे त्यांच्या आईस सांगितले़ यानंतर या दोघा भामट्यांनी वाळके यांच्या बंगल्यातील बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा व लॉकर तोडून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १० ग्रॅम वजनाची एक व ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन टायटन कंपनीची घड्याळे व रोख रक्कम असा ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़

या प्रकरणी दीपक वाळके यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,fake,census,employee,gold,theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.