जिल्हा न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट सोसायटीतील दस्त नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:52 PM2018-03-10T23:52:08+5:302018-03-10T23:52:08+5:30

नाशिक : १९७८ साली कै़बाबुराव ठाकरे यांनी नवीन वकीलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वकीलांसाठी सहकार संस्थेची स्थापना केली़ वकीलांच्या अडचणींसाठी धावून जाणारे, सर्वतोपरी मदत करणा-या ठाकरे यांना वकीलांनी तब्बल ४० वर्षे नेता म्हणून स्वीकारले़ आपल्या कर्तृत्वाने नाशिकचे नाव त्यांनी राज्यात पोहोचविले असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी केले़

nashik,district,court,advocate,society,Registration | जिल्हा न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट सोसायटीतील दस्त नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ

जिल्हा न्यायालयातील अ‍ॅडव्होकेट सोसायटीतील दस्त नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्दे दि नाशिक डिस्ट्रीक्ट अ‍ॅडव्होकेटस मल्टीपर्पज को. आॅप. सोसायटीदस्त नोंदणी परवाना प्राप्त उपक्रमाचा शुभारंभ

नाशिक : १९७८ साली कै़बाबुराव ठाकरे यांनी नवीन वकीलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वकीलांसाठी सहकार संस्थेची स्थापना केली़ वकीलांच्या अडचणींसाठी धावून जाणारे, सर्वतोपरी मदत करणा-या ठाकरे यांना वकीलांनी तब्बल ४० वर्षे नेता म्हणून स्वीकारले़ आपल्या कर्तृत्वाने नाशिकचे नाव त्यांनी राज्यात पोहोचविले असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी केले़

जिल्हा न्यायालयातील दि नाशिक डिस्ट्रीक्ट अ‍ॅडव्होकेटस मल्टीपर्पज को. आॅप. सोसायटीच्यावतीने सुरू करण्यात येत असलेल्या लिव्ह अ‍ॅण्ड लायसेन्स दस्त नोंदणी परवाना प्राप्त उपक्रमाच्या शुभारंभ व संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. बाबुराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे अनावरण शनिवारी (दि़१०) न्यायमूर्ती बोरा यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. बोरा पुढे म्हणाले की, ठाकरे यांनी वकीलांसाठी चेंबर, सहकार संस्था यांची स्थापना केली़ सोसायटीला लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स दस्त नोंदणीचा परवाना मिळाल्याने आता निबंधकांकडे हेलपाटे मारण्याची गरज राहिलेली नाही. जिल्हा न्यायालयासाठी मिळालेली अडीच एकर जागा ही न्यायालयाच्या दृष्टीने कमी असून आगामी ५० वर्षांचे नियोजन पाहाता अधिक जागा मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्नाची आवश्यकता असल्याचे बोरा यांनी सांगितले़

यावेळी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी दी नाशिक डिस्ट्रीक्ट अ‍ॅडव्होकेटस मल्टीपर्पज सोसायटीच्या लिव्ह अ‍ॅण्ड लायसेन्स दस्त नोंदणी कार्यालयास नवीन न्यायालय इमारतीत जागा देण्याचे आश्वासन दिले. तर नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा सादर केला़

यावेळी जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड़ अजय मिसर, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाचे सदस्य अ‍ॅड़ जयंत जायभावे, अ‍ॅड़ जालिंदर ताडगे, संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड़ विजया शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड़भरत ठाकरे, अ‍ॅड़ रमेश कुशारे आदी उपस्थित होते.

Web Title: nashik,district,court,advocate,society,Registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.