नाशिकमधील दिड हजार डॉक्टर्स संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 06:30 PM2019-06-17T18:30:37+5:302019-06-17T18:31:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे ...

nashik,dish,thousand,doctors,strike,in,nashik | नाशिकमधील दिड हजार डॉक्टर्स संपावर

नाशिकमधील दिड हजार डॉक्टर्स संपावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,
नाशिक: पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे सुमारे दिड हजार डॉक्टर्स सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे रूग्णालयांमधील बाह्यरूग्ण विभागातील कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याचा कायदा करण्याबाबत आयएमए येथे झालेल्या चर्चेत डॉक्टरांनी अनेक प्रस्ताव सादर केले.
पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या हल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात केंद्राने कायदा करावा अशी मागणी घेऊन आयएमएने देशभर संपाची हाक दिली आणि सर्वत्र संप सुरू झाला. या संपात नाशिक आयएमएने देखील सहभाग घेत सकाळी ६ वाजेपासून शहरातील आपत्कालीन सेवा सुरू ठेऊन संपाला सुरूवात करण्यात आली. या संपात शहरातील जवळपास ५०० रूग्णालांमधील आयएमएचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. आयएएमला डेंटल आणि फिजिओ थेरपी डॉक्टरांनी देखील पाठींबा दर्शवित संपात सहभाग नोंदविला तर इतर पॅथींचा डॉक्टरानी, तसेच वैद्यकीय महाविदयलयांती डॉक्टर्स यांनी देखील पाठींबा दर्शविला अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांनी दिली.

Web Title: nashik,dish,thousand,doctors,strike,in,nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.