नाशिक ग्रामीण जिल्ह्यात हेल्मेट पंधरवडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:40 PM2019-02-06T21:40:53+5:302019-02-06T21:41:44+5:30

त्र्यंबकेश्वर : दुचाकी स्वारांचे अपघात कमी होवून त्यात नाहक बळी जाणाऱ्यांचे प्रमाण घटलेजावे याकरीता नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हेल्मेट सक्ती पंधरवड्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी सांगितले.

Nashik rural district helmet fortnight! | नाशिक ग्रामीण जिल्ह्यात हेल्मेट पंधरवडा !

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात हेल्मेट पंधरवडा !

Next
ठळक मुद्दे ही मोहिम केवळ १५ दिवसच नव्हे तर कायम स्वरुपी

त्र्यंबकेश्वर : दुचाकी स्वारांचे अपघात कमी होवून त्यात नाहक बळी जाणाऱ्यांचे प्रमाण घटलेजावे याकरीता नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हेल्मेट सक्ती पंधरवड्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी सांगितले.
आतापर्यंत दुचाकी अपघात होवून मृत्युमुखी पडलेले दुचाकीस्वार केवळ हेल्मेट अभावी डोक्याला मार लागुनच मरण पावलेले आहेत. डोक्यात हेल्मेट असते तर मृत्युमुखी पडणारांची संख्या किमान कमी तरी असती. यावरु न हेल्मेट सक्ती करणे हाच उपाय आहे. यासाठी न्यायालयाला खास आदेश द्यावे लागले. तरीही दुचाकी स्वार हेल्मेट वापरताना दिसत नाही. आता ग्रामीण पोलीसांनी दि.१ ते १५ फेब्रुवारी दरम्यान संपुर्ण जिल्ह्यात हेल्मेट पंधरवडा जाहीर करण्यात केला आहे व तो जिल्ह्यात कसोशीने पाळणे सुरु केले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी नुकतीच गुन्हे परिषद घेतली, यावेळी जिल्ह्यातील मोटार अपघात गुन्ह्यांचा आढावा घेतला असता मोटार अपघातातील मयतांचा आकडा सुमारे ३७७ असून त्यात सर्व मोटारसायकलस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यासंदर्भात दराडे यांनी जिल्ह्यातल सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन नाशिक ग्रामीण जिल्ह्यात मालेगाव शहरासह दि.१ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हेल्मेट सक्ती विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर पोलीसांकडुन देखील स्वत:चे संरक्षण कुटुंबाचे रक्षण अर्थात हेल्मेट पंधरवडा पाळला जात आहे. तसेच या मोहिमेदरम्यान ‘स्वत:चे संरक्षण, कुटूंबाचे रक्षण’ अशाप्रकारे जनजागृती करण्यास सुरु वात केली आहे. ज्या दुचाकीस्वारांनी वाहतूक नियमांचे पालन केले, अशा दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर जे दुचाकीस्वार विना हेल्मेट प्रवास करताना दिसले, अशांवर वाहतुक नियमांचे उल्लंघन केले म्हणुन त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत एकुण ४५ केसेस करण्यात येऊन सुमारे २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहिम केवळ १५ दिवसच नव्हे तर कायम स्वरुपी राबवून हेल्मेटची दुचाकीस्वारांना सवय होईपर्यंत राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान हेल्मेट पंधरवडा त्र्यंबकेश्वर शहरात प्रकर्षाने पाळावा यासाठी येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (फोटो ०६ त्र्यंबक)

Web Title: Nashik rural district helmet fortnight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.