नाशिक-मुंबई रेल्वे अजूनही विस्कळीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:03 AM2018-10-13T00:03:12+5:302018-10-13T00:45:14+5:30

रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे काही रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, मनमाड-इगतपुरी शटल ही शनिवार-रविवार रद्द करण्यात आली आहे.

Nashik-Mumbai trains still in disarray | नाशिक-मुंबई रेल्वे अजूनही विस्कळीतच

नाशिक-मुंबई रेल्वे अजूनही विस्कळीतच

Next

नाशिकरोड : रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे काही रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, मनमाड-इगतपुरी शटल ही शनिवार-रविवार रद्द करण्यात आली आहे.
रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे शुक्रवारी एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी दोन तास, मुंबई-पाटणा अडीच तास, दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ५० मिनिटे उशिरा, एलटीटी-काजीपेट तीन तास उशिराने सुटल्या. पनवेल-गोरखपूर ही गाडी सायंकाळी सहाऐवजी रात्री नऊला सुटली. तसेच इगतपुरी रेल्वेस्थानकावर एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर दुपारी २.५५ पासून सायंकाळी ४.२० पर्यंत, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस दुपारी ३.२० पासून ४.४५ पर्यंत थांबवून सोडण्यात आली.
मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या शुक्रवारी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन-तीन तास उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडून पडले. यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

Web Title: Nashik-Mumbai trains still in disarray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.