नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या २४ फेऱ्या पूर्ण; गोडसे २ लाख ८१ हजार मतांनी भुजबळांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:39 PM2019-05-23T22:39:41+5:302019-05-23T22:40:13+5:30

मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे

 Nashik Lok Sabha election results 2019: 24 rounds of counting done; Godse 2, 81 thousand votes ahead of Bhujbal | नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या २४ फेऱ्या पूर्ण; गोडसे २ लाख ८१ हजार मतांनी भुजबळांच्या पुढे

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या २४ फेऱ्या पूर्ण; गोडसे २ लाख ८१ हजार मतांनी भुजबळांच्या पुढे

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ६४ हजार ५२९ मते

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाºया नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते; मात्र मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे. गोडसे यांनी विजयाचा जल्लोष साजरा क रण्यास सुरूवात केली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्यांत सुरू असून नाशिकमध्ये २४व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ५ लाख ४५ हजार ७१३ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ६४ हजार ५२९ मते पडली आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.

Web Title:  Nashik Lok Sabha election results 2019: 24 rounds of counting done; Godse 2, 81 thousand votes ahead of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.