नाशिक-बारागावपिंप्री बससेवेला सहा वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:18 PM2019-05-13T17:18:50+5:302019-05-13T17:20:47+5:30

सिन्नर : नाशिक आगारातून बारागावपिंप्री येथे मुक्कामी बससेवा नियमित सुरू आहे. या बसला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाहक व चालक यांचा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Nashik-Barawag Pimpri Bus Service has completed six years | नाशिक-बारागावपिंप्री बससेवेला सहा वर्षे पूर्ण

नाशिक-बारागावपिंप्री बससेवेला सहा वर्षे पूर्ण

Next

सदर बसमुळे बारागावपिंप्री, निमगाव, गुळवंच, केपावाडी, हिवरगाव, पाटपिंप्री, सुळेवाडी या गावांतील व परिसरातील ग्रामस्थांना या बससेवेचा लाभ होत आहे. ही बससेवा पाटपिंप्री येथून सकाळी ६ वाजता सुटत असून सुळेवाडी, देशवंडी, जायगाव, नायगाव, ब्राम्हणवाडे, शिंदे या मार्गाने सकाळी ७.३० नाशिक येथे पोहोचते. बारागावपिंप्री परिसरात नाशिकला ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक -बारागावपिंप्री बससेवेमुळे प्रवासी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक व महिलांना जाण्या-येण्यासाठी उपयोग होतो. अखंड सहा वर्षे सेवा दिल्याबद्दल बारागावपिंप्री येथे बसचालक व वाहकाचा सत्कार करून पेढेवाटप करण्यात आले. यावेळी अण्णा भाऊ ताकाटे, अजिज शेख, सागर गोसावी, सार्थक गोसावी, शरद गोसावी आदी उपस्थित होते.

Web Title: Nashik-Barawag Pimpri Bus Service has completed six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.