नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:54 PM2018-03-15T22:54:34+5:302018-03-15T22:54:34+5:30

देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Nagar Panchayat workers' agitation | नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देदेवळा : विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन घोषणा देण्यात येऊन शासनाचा निषेध

देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
नगरपंचायतीमधील तत्कालीन ग्रामपालिकेमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांचे नगरपंचायतमध्ये समावेशन करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिटू संलग्न यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नवनिर्मित कर्मचाºयांनी गुरुवारी निदर्शने केली. देवळा नगरपंचायत कर्मचाºयांनी आंदोलनाला पाठिंबा देत नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता एक तास निदर्शने केली. यावेळी घोषणा देण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात आला.
देवळा नगरपंचायतीत वर्षभरापूर्वी दोन कर्मचाºयांचे समावेशन झाले असून, उर्वरित कर्मचारी समावेशन होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर अहेर, दत्तात्रय बच्छाव, सुरेश अहेर, दीपक गोयल, सुनील शिलावट, वसंत अहेर, शांताराम घुले, विकास अहेर, माणिक अहेर, राजेंद्र शिलावट, जागृती गोयल, सुशीला घोडेस्वार, धनुबाई गोयल, हौशाबाई साळुंके, विमल देवरे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.या कर्मचाºयांना नगरपंचायत कामकाजाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे कामकाजात अनेक अडचणी येतात. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या कर्मचाºयांचे समावेशन शैक्षणिक-तांत्रिक अर्हता सर्व पात्रता धारण करणारे पद उपलब्ध नसल्याने व इतर विविध कारणास्तव हे कर्मचारी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Web Title: Nagar Panchayat workers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक