महापालिका : सुधारित आकृतिबंधाकडे लक्ष अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:34 AM2018-06-01T01:34:14+5:302018-06-01T01:34:14+5:30

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते.

Municipal Corporation: Insufficient manpower in the Fire Brigade Focus on the Revised Shape | महापालिका : सुधारित आकृतिबंधाकडे लक्ष अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ

महापालिका : सुधारित आकृतिबंधाकडे लक्ष अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ

Next
ठळक मुद्देशासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाहीदलाला नियोजन करतानाही अडचणीचे

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते. मात्र, याच अग्निशमन दलात सध्या अवघे दीडशे कर्मचारी कार्यरत असून, अपुऱ्या मनुष्यबळाची चिंता भेडसावत आहे. महापालिकेने सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाही.
महापालिकेच्या अग्निशमन दलात सद्य:स्थितीत १५३ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात शहराचा वाढता विस्तार पाहता दलाला ५५० कर्मचाºयांची आवश्यकता आहे. दर वर्षी दलातून ५ ते १० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. कर्मचाºयांची घटणारी संख्या आता अग्निशमन विभागाला भेडसावत आहे. बºयाचदा कर्मचाºयांच्या रजा लक्षात घेता दलाला नियोजन करतानाही अडचणीचे ठरते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीचा प्रश्न समोर आला होेता.
परंतु, त्याला मान्यता मिळालेली नव्हती. त्यावेळी सुमारे ७५० कर्मचारी भरतींचा प्रस्ताव होता. अग्निशमन दलातून काही अनुभवी कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांची जागा भरून काढणारे कर्मचारी उपलब्ध होणे अवघड होऊन बसले आहे. शहरात दरवर्षी आगीच्या घटनांचे असणारे प्रमाण तसेच पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाºया पूरस्थितीचा सामना महापालिकेच्या अग्निशमन विभागाला करावा लागतो. याशिवाय, जिल्ह्यात कुठे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नाशिकच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलाने सायखेडा नांदूरमध्यमेश्वर येथे काही लोकांना पूरस्थितीतून वाचवले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या सात कर्मचाºयांना राष्टÑपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अपुºया मनुष्यबळावर महापालिकेचा अग्निशमन विभाग कार्यरत असून, महापालिकेने शासनाकडे पाठविलेल्या सुधारित आकृतिबंधाची आता प्रतीक्षा आहे.

Web Title: Municipal Corporation: Insufficient manpower in the Fire Brigade Focus on the Revised Shape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.