नाशिकमध्ये वडाच्या झाडावर पालिकेचा बुलडोझर; मनपाकडून झाडांचे ‘एन्काऊंटर’ होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:07 PM2017-11-18T14:07:46+5:302017-11-18T14:11:15+5:30

एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे.

Municipal bulldozer on the Vad tree in Nashik; Environmentalists accused the plant of 'an encounter' of the plant | नाशिकमध्ये वडाच्या झाडावर पालिकेचा बुलडोझर; मनपाकडून झाडांचे ‘एन्काऊंटर’ होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

नाशिकमध्ये वडाच्या झाडावर पालिकेचा बुलडोझर; मनपाकडून झाडांचे ‘एन्काऊंटर’ होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

Next
ठळक मुद्दे उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केलीवटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही नाशिक महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान, येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाच्या डेरेदार वृक्षावरही बुलडोझर चालविला. वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. सदर वटवृक्ष हा वाहतूकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण निर्णय समितीपुढे कुठलाही विषय मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवून एकीकडे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असताना याचदरम्यान पालिकेला उच्च न्यायालयाचाच झाडांबाबतच्या आदोशाचा विसर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडाच्या प्रजातीची वृक्ष न्यायालयाच्या आदेशानंतरच हटविली जावी, असे असतानाही पालिकेकडून वडाचे डेरेदार झाड तोडण्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. रहदारीच्या ठिकाणी असलेला हा वटवृक्ष पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा होता. वटवृक्ष हा हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागातून दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वटवृक्षाची भूमिका महत्त्वाची ठरत होती; मात्र महापालिकेच्या अधिकाºयांनी याचा कुठलाही विचार न करता थेट वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंग यांनी सांगितले. अवैधरित्या वृक्षतोड हे एकप्रकारचे ‘एन्काऊंटर’ महापालिका झाडांचे करत आहेत. वटवृक्षाला उच्च न्यायालयाकडून संरक्षण प्राप्त असून जर वड प्रजातीची वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी जरी असतील तरी ती न्यायालयाच्या आदेशानंतरच हटविली जावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे, त्यामुळे वटवृक्ष महपालिकेने अनधिकृतपणे हटविला असून न्यायालयाचा अवमान केल्याचे जगबीर सिंग यांनी सांगितले. याप्रकरणी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Municipal bulldozer on the Vad tree in Nashik; Environmentalists accused the plant of 'an encounter' of the plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.