मुंढेंनी खासदार गोडसेंची केली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:03 AM2018-04-13T01:03:09+5:302018-04-13T01:03:09+5:30

नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Mundanei MP Godsechi Kandi | मुंढेंनी खासदार गोडसेंची केली कोंडी

मुंढेंनी खासदार गोडसेंची केली कोंडी

Next
ठळक मुद्दे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केलीहेमंत गोडसे त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त

नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शहरात सध्या मोकळ्या भूखंडावरील कराचा मुद्दा गाजत असून, गावोगाव शेतकऱ्यांचे मेळावे सुरू झाले आहेत. शहरात मोकळ्या भूखंडावर कर लावण्यात आल्याने त्यात शेती क्षेत्राचादेखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शेती केली जाते अशा भूखंडांवरील करयोग्य मूल्यात वाढ करताना तीन पैशांवरून चाळीस पैसे दर निश्चित केल्याने शेतकºयांना वार्षिक प्रति एकर एक लाख रु पयांपेक्षा अधिक कर भरावा लागणार असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे शहरातील ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत
आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मनपातील शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी आयुक्तांची
भेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली. परंतु आयुक्तांनीच शेतीवर नव्हे तर जमिनीवर कर लावल्याचे स्पष्टीकरण देताना शेतजमीन असा कुठलाच उल्लेख नसल्याचा खुलासा केला. तसेच अधिसूचनेची पूर्ण माहिती घेण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे.
यावेळी खासदारांसह सेना पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये प्रश्न-उत्तरेही झडलेत. परंतु आयुक्त भूमिकेवर ठाम राहिल्याचे चर्चा होत आहे.

Web Title: Mundanei MP Godsechi Kandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.