एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:16 AM2018-02-01T00:16:41+5:302018-02-01T00:18:35+5:30

२००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींनी बुधवारी (दि़ ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़

 Morcha in MPSC 'Dummy' student case | एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा

एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा

Next

नाशिक : २००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या परीक्षार्थींनी बुधवारी (दि़ ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़ मुख्यमंत्र्यांनी गैरमार्गाने प्रशासन सेवेत आलेल्यांवर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़  शालिमार परिसरातील बी़ डी़ भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मूक मोर्चा शालिमार, एमजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला़ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील बोगस नोकरभरती उघड झाली असून, भायखळा पोलिसांनी पाच जणांना, तर विक्रीकर निरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसविणाºया नांदेडच्या दोघांना अटकही केली आहे़ २००९ पासून सुरू असलेल्या या भरतीप्रक्रियेशी अटक करण्यात आलेल्या संशयितांचा संबंध असण्याची शक्यता असून, एकंदरीतच आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जाते आहे़
राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया परीक्षार्थींची संख्या दहा लाखांच्या आसपास असून, प्रशासन सेवेत येण्यासाठी विद्यार्थी कठोर मेहनत घेतात; मात्र या भरतीप्रक्रियेतच जर गैरप्रकार होत असतील तर आयोगाची कार्यपद्धती व कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़  राज्य लोकसेवा आयोगासोबत संधान साधून गैरमार्गाने प्रशासकीय सेवेत येणारे नागरिकांच्या समस्या कशा सोडविणार, प्रामाणिकपणे अभ्यास करणाºयांचे काय, असे अनेक सवाल परीक्षार्थींनी उपस्थित केले़ या प्रकरणाची संपर्णू  सीबीआय मार्फत चौकशी करावी तसेच गैरमार्गाने अधिकारी झालेल्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे या मागण्या करण्यात आल्या असून, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ या मोर्चामध्ये अजित देशमुख, अनुराग चिंचोरे, किरण ताडगे, ज्ञानेश्वर घोटेकर, सतीश शहाणे, योगिता कदम, उषा पवार, नेहा कोटक यांच्यासह परीक्षार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ 
परीक्षार्थींच्या मागण्या  
नाशिकला विभागीय मुख्यालय करावे़ ,  परीक्षार्थींची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जावी ,  रद्द केल्या जाणाºया प्रश्नांचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे़ , परीक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर सिस्टिम असावी़ ,  ३० टक्के कपातीची बंदी उठवावी. , सरळ सेवेतील महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास तसेच इतर अनुषंगिक विभागातील वर्ग ३ ते वर्ग १ ची विविध पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात यावीत.

Web Title:  Morcha in MPSC 'Dummy' student case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.