संस्थाचालकांचा अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा

By Admin | Published: August 10, 2015 11:17 PM2015-08-10T23:17:25+5:302015-08-10T23:21:44+5:30

संस्थाचालकांचा अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा

Morcha of Ambad police station on behalf of the organizers | संस्थाचालकांचा अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा

संस्थाचालकांचा अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा

googlenewsNext

सिडको : शिक्षक आणि मुख्याध्यापकांना धमकाविणाऱ्या पालकाविरुद्ध सेंट लॉरेन्स शाळेतील शिक्षकांसह शहरातील खासगी शाळा संस्थाचालकांनी मोर्चा काढून अंबड पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
शालेय बसचा पाठलाग करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न संबंधित पालकाने केल्याचा आरोप शाळेच्या वतीने करण्यात आला. या विरोधात महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने अंबड पोलीस मूक मोर्चा काढून निवेदन देणयात आले. या मोर्चात सेंट लॉरेन्सचे विश्वस्थ सुमन दत्त, नलिनी दत्त, सचिन जोशी, डॉ. प्रिन्स शिंदे, कुमोदिनी बंगेरा यांसह नाशिक शहरातील सुमारे वीसहून अधिक शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Morcha of Ambad police station on behalf of the organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.