मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:20 AM2019-07-21T01:20:22+5:302019-07-21T01:20:58+5:30

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात ६० ‘आपला दवाखाना’ मंजूर केले आहेत. त्यातील १० दवाखाने शहरात उघडले जातील. गोरगरिबांची मोठी वस्ती असणाऱ्या भागात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असून (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ते सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.२०) नाशिकमध्ये दिली.

 The 'Mohalla Clinic' | मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

साथ रोगाबाबत महापालिकेत शनिवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत बोलताना सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे. समवेत महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच आरोग्य संचालक रत्ना पाटील, सहसंचालक सतीश पवार, उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देएकनाथ शिंदे; साथीच्या रोगांचा घेतला आढावा

नाशिक : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात ६० ‘आपला दवाखाना’ मंजूर केले आहेत. त्यातील १० दवाखाने शहरात उघडले जातील. गोरगरिबांची मोठी वस्ती असणाऱ्या भागात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असून (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ते सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.२०) नाशिकमध्ये दिली. साथरोगांचा आढावा घेताना डासांमुळे होणाºया आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्माणाधिक बांधकामांमध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी विकासकांना सूचना द्यावी, असे सांगताना प्रसंगी कारवाईचे आदेशही त्यांनी दिले.
राज्यात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आणि मृत्यू नाशिकमध्ये होत असून, आता डेंग्यूची साथही सुरू झाल्याने आरोग्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.२०) सकाळी महापालिका स्थायी समिती सभागृहात साथीच्या आजारांबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्य सहसंचालक डॉ. सतीश पवार, संचालक डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक (आरोग्य) डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपमहापौर प्रथमेश गिते तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते.
राज्यात मुंबई, नाशिक, पुणे, नगर या भागात स्वाइन फ्लूचे रु ग्ण वाढत आहे. वातावरणात बदल झाल्यानंतर साथीचे आजार बळावतात. त्यांना आळा घालण्यासाठी संवेदनशील भागात स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, खासगी डॉक्टर आदींनी सामूहिक जबाबदारी मानून काम करावे.
मनपाकडे फक्त ५० लसी उपलब्ध
सध्या महापालिकेकडे स्वाइन फ्लूच्या केवळ ५० लस, तर टॅमी फ्लूच्या ७ हजार ५०२ गोळ्या शिल्लक आहेत. त्यामुळे महापालिकेने चार हजार लस आणि १६ हजार गोळ्यांची मागणी नोंदविली, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागातील महत्त्वपूर्ण पदांसह एकूण ३६० पदे तसेच एनएचयूएमची १३९ पदे रिक्त आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली, तसेच महापालिकेचा नवीन आकृतिबंध शासन स्तरावर रखडलेला आहे, असे शिंदे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाच्या महाभरतीत आरोग्य विभागातील रिक्त पदांचा विषय मार्गी लागणार असून, प्रलंबित आकृतिबंध मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title:  The 'Mohalla Clinic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.