मिशन डॅमेज कंट्रोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:09 AM2018-03-19T01:09:07+5:302018-03-19T01:09:07+5:30

नाशिक : शिवसेनेची राज्यात सत्ता आली खरी, परंतु या दरम्यान, स्थानिक पातळीवरील गटबाजी किंवा अन्य कारणाने अनेक कार्यकर्ते दुरावले गेले. अशा दुरावलेल्या आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे काम शिवसेनेने नवनियुक्त महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्यावर सोपवले असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कृतीही सुरू केली आहे. विशेष म्हणजे नेते ठीक, परंतु स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीच सोमवारी (दि.१९) पदग्रहण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईच्या कोणत्याही नेत्याशिवाय हा कार्यक्रम होणार आहे.

Mission Damage Control! | मिशन डॅमेज कंट्रोल !

मिशन डॅमेज कंट्रोल !

googlenewsNext
ठळक मुद्देमराठे पॅटर्न कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज पदग्रहण

नाशिक : शिवसेनेची राज्यात सत्ता आली खरी, परंतु या दरम्यान, स्थानिक पातळीवरील गटबाजी किंवा अन्य कारणाने अनेक कार्यकर्ते दुरावले गेले. अशा दुरावलेल्या आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे काम शिवसेनेने नवनियुक्त महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्यावर सोपवले असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कृतीही सुरू केली आहे. विशेष म्हणजे नेते ठीक, परंतु स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीच सोमवारी (दि.१९) पदग्रहण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईच्या कोणत्याही नेत्याशिवाय हा कार्यक्रम होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अगोदरपासूनच शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे वारे वाहत होते. तथापि, महापालिका निवडणुका समोर असल्याने त्यात बदल झाले नव्हते. आता मात्र पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर शिवसेनेने आखलेल्या रणनितीचा भाग म्हणून सचिन मराठे व महेश बडवे या दोघांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण नाशिक महानगरातील चार मतदारसंघांपैकी मध्य नाशिक व देवळाली मतदारसंघ हे मराठे यांच्या तर पूर्व आणि पश्चिम नाशिक मतदारसंघ हे महेश बडवे यांच्या यांच्याकडे देण्यात आले आहेत. या दोघांनीही रविवारी (दि.१८) गुढीपाडव्याचे निमित्त करून नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मराठे यांनी तर अधिकाधिक सामान्य कार्यकर्त्यांना भेटी देण्यावर भर दिला.
गेल्या काही वर्षांत पक्षातील अंतर्गत मतभिन्नता अथवा नेत्यांनी वाऱ्यावर सोडून दिल्याने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली होती. त्यातूनच जुन्या शिवसैनिकांच्या होणाºया मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद हा त्याचेच द्योतक मानला जात होता. मराठे यांनी अशाप्रकारे पक्षातील दुरावलेल्यांना मात्र एकत्र सांधण्याची तयारी केली असून, त्याचाच पहिला भाग म्हणून सोमवारी (दि.१९) सकाळी १० वाजता शिवसेना भवनात सामान्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा होणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.
मुंबईहून नेते येण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच पदग्रहण करण्यास पक्षाच्या नेत्यांनीही हिरवा कंदील दिला आहे. तळातील कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद असल्याने त्यांंचे पुनर्संघटन करण्यावर आपला भर असून, त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना परत पक्षात आणण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या परवानगीने काम करणार असल्याचे मराठे यांनी सांगितले. शिवसैनिकाला संधी शिवसेनेतून मूळ सैनिक दुरावला जात असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत असताना पक्षाने २७ वर्षांपासून पक्षात काम करणाºया शिवसैनिकांला संधी मिळाली असल्याची भावना मराठे यांच्या समर्थकांनी व्यक्त केली. यापूर्वीही मराठे यांनी महानगरप्रमुख म्हणून अल्पकाळ केले आहे.

Web Title: Mission Damage Control!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.