शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:12 AM2018-01-14T01:12:12+5:302018-01-14T01:16:04+5:30

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदारसंघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीला यापुढे थारा नको, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

 'Missal Party' for Shiv Sainiks | शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’

शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’

Next
ठळक मुद्देभाजपाला शह : जुन्या पदाधिकाºयांना आणणार प्रवाहातपक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदारसंघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीला यापुढे थारा नको, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
शनिवारी सातपूरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपूर मतदारसंघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर येऊन गेलेले उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याची जोड देऊन त्याचे कौतुक केले होते व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केल्याने शनिवारच्या मिसळ पार्टीला संजय राऊत यांच्यासह जिल्हा संपर्क नेते आमदार अजय चौधरी हेदेखील उपस्थित होते.
साधारणत: दीडशेहून अधिक जुने, निष्ठावंत शिवसैनिकांची यादी तयार करून त्यांना ‘मिसळ पार्टी’चे घरपोच निमंत्रण देण्यात आले व त्यांना शनिवारच्या मिसळ पार्टीत आदराचे स्थान देण्यात आले. काही कारणास्तव पक्षापासून दुरावले असलेले किंवा गटबाजीमुळे दूर गेलेल्यांचा सत्कारही यावेळी पक्ष नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी, महापालिका निवडणुकीत काय झाले ते विसरून व झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याचे आवाहन केले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यात मिसळा व त्यांची कामे करा, असा सल्ला देऊन ‘मिसळ पार्टी’ही मनोमीलनासाठी उपयुक्त असून, त्यात गटबाजीला थारा नको, प्रत्येक मतदारसंघात असा उपक्रम राबविला जावा व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सागिंतले. यावेळी आमदार चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. आगामी काळात नाशिक मध्य, नाशिक पूर्व या मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जुन्या सैनिकांना साथ या मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसेनेने विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात असून, त्याची सुरुवात १९८२ पासून शिवसेनेत सक्रिय असलेले परंतु विविध कारणास्तव पक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यात आली आहे.

Web Title:  'Missal Party' for Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.