सिमेंट बाकांच्या खरेदीत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:18 PM2018-10-23T23:18:47+5:302018-10-23T23:24:32+5:30

कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा विषय ठरत आहे.

Misrepresentation of purchase of cement bags | सिमेंट बाकांच्या खरेदीत गैरव्यवहार

सिमेंट बाकांच्या खरेदीत गैरव्यवहार

Next

कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा विषय ठरत आहे.
कसबे सुकेणे ग्रामपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी गटांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. सरपंच गीता गोतरणे व सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाला असून, सिमेंट बाके खरेदी करताना ती उत्पादकाकडून खरेदी न केल्याने या खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप धनंजय भंडारे, उपसरपंच सविता जाधव, सोमनाथ भागवत, रमेश जाधव, अतुल पाटील, मनीषा भंडारे, सुरेखा औसरकर, आरती कर्डक, सय्यद आबेदा अली यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
आनंदराव भंडारे यांनीही सिमेंट बाक खरेदी गैरव्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपालिकेला ३० बाके भेट दिली. या बाकांवर त्यांचे मूल्य असून, एकूण किंमत २१०० रुपये असल्याचे नमूद करून ग्रामपालिकेने खरेदी केलेले व आनंदराव भंडारे यांनी विनामूल्य दिलेल्या सिमेंटच्या बाकड्यांच्या किमतीत कशी तफावत आहे, हे दर्शवित गैरव्यवहाराच्या विरोधात अभिनव आंदोलन छेडले.
यात आनंद भंडारे, सोमनाथ भागवत, सचिन पाटील, किशोर कर्डक, राजू वडघुले, शौकत सय्यद, वृषभ जाधव, विजय चव्हाण आदींचा सहभाग होता. कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सत्ताधारी मनमानी कारभार करत असून, सिमेंट बाक खरेदीत दोन लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. याविरु द्ध आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.
- धनंजय भंडारे, सदस्य
ग्रामपालिकेची सिमेंट बाक खरेदी ही शासनाच्या ई-टेंडर प्रक्रि येतून झाली आहे. विरोधक राजकीय हेतूने आरोप करीत आहे.
- छगन जाधव, सत्ताधारी गट

Web Title: Misrepresentation of purchase of cement bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.