म्हसरूळ : बाकावर बसलेल्या युवकावर झाडल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 06:28 PM2018-06-07T18:28:08+5:302018-06-07T19:44:05+5:30

दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अज्ञात कारणावरून वाद करत जवळील पिस्तूल काढून त्याच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडल्या.

Mhasrulal: The bullets that hit the young man on the bench | म्हसरूळ : बाकावर बसलेल्या युवकावर झाडल्या गोळ्या

म्हसरूळ : बाकावर बसलेल्या युवकावर झाडल्या गोळ्या

googlenewsNext
ठळक मुद्देएक गोळी डोक्यात घुसली पोलिसांपुढे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

पंचवटी : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये बुधवारी (दि.७) रात्री जेवणानंतर बाकावर बसून मित्रासमवेत गप्पा मारणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत वाद घालून थेट डोक्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नितीन परदेशी नामक युवक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ एकतानगर येथे राहणारा नितीन परदेशी हा बुधवारी (दि.६) रात्री साडेदहा वाजता परिसरातील साती आसरा मंदिराजवळ लोखंडी बाकावर मित्रासमवेत बसलेला होता. यातील काही युवक यावेळी मद्यपान करत होते. मद्यपान झाल्यानंतर ते निघून गेले असता बाकावर नितीन एकटाच होता. यावेळी दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अज्ञात कारणावरून वाद करत जवळील पिस्तूल काढून त्याच्या डोक्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी डोक्यात घुसली तर दुसरी गोळी छाटून गेल्याचे समजते. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गोळीबाराच्या घटनेने म्हसरूळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, पोलीस हल्लेखोरांचा माग काढत असले तरी उशिरापर्यंत संशयितांना अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान, डोक्यात गोळी शिरल्याने नितीनची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बोरगड (एकतानगरला) झालेल्या गोळीबाराच्या घटनेत युवक जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिका-यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, या गोळीबार घटनेनंतर म्हसरूळ पोलिसांनी वाल्मीकनगर (वाघाडी) परिसरात राहणाºया एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळला एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाली होती, तर गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा होती, परंतु पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नव्हता. एकूणच म्हसरूळ शिवारात राजरोसपणे सर्रास गावठी पिस्तूल घेऊन फिरणा-या गुन्हेगारांची दहशत वाढत असून, पोलिसांपुढे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी जखमी नितीनच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Mhasrulal: The bullets that hit the young man on the bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.