Mercury at 10.6 degree: Somewhat comfort from the intensity of cold in Nashik | पारा १०.६ अंशावर : नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा

ठळक मुद्दे. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे . हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली

नाशिक : शहराच्या किमान तपमानात बुधवारी (दि.३) पुन्हा वाढ झाली. तपमान १०.६ अंश इतके नोंदविले गेल्याने थंडीचा कडाका कमी झाल्याचे नाशिककरांना जाणवले. बुधवारी संध्याकाळीदेखील हवेत फारसा गारवा निर्माण झाल्याचे जाणवले नाही.
मागील दोन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानात वाढ होऊ लागली होती; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने रूप बदलले असून, मंगळवारी तपमान पुन्हा कमी होऊन पारा ८.२ अंशांपर्यंत घसरला; मात्र बुधवारी थेट दोन अंशांनी पारा वर सरकल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. पंधरवड्यापासून नाशिकचे किमान तपमान १० अंशाच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे सरकल्याने नाशिककरांना बोच-या थंडीपासून काहीसा आधार मिळाला.
शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता; मात्र बुधवारी याविरुध्द स्थितीचा अनुभव नागरिकांनी घेतला. पारा अचानकपणे एका दिवसात दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती.


Web Title: Mercury at 10.6 degree: Somewhat comfort from the intensity of cold in Nashik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.