स्मृती विश्वास यांना जीवनगौरव पुरस्कार निफ महोत्सव : सुषमा शिरोमणी, वर्षा उसगावकर, गजेंद्र अहिरे पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:03 AM2018-03-23T01:03:49+5:302018-03-23T01:03:49+5:30

नाशिक : निफ २०१८ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती विश्वास यांना, तर प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक अभिनेत्री सुषमा शिरोमणी, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मराठी सिनेमा जगभर पोहचवणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना निफ सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला.

Memorial Award for Smriti Biswas NIF Festival: Sushma Shiromani, Varsha Usgaonkar, Gajendra Ahire Award | स्मृती विश्वास यांना जीवनगौरव पुरस्कार निफ महोत्सव : सुषमा शिरोमणी, वर्षा उसगावकर, गजेंद्र अहिरे पुरस्काराने सन्मानित

स्मृती विश्वास यांना जीवनगौरव पुरस्कार निफ महोत्सव : सुषमा शिरोमणी, वर्षा उसगावकर, गजेंद्र अहिरे पुरस्काराने सन्मानित

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या कलावंतांनी जास्त मेहनत करायला हवीशहराने दिलेल्या प्रेमाचे कायम ऋणी राहण्याचा विश्वास

नाशिक : निफ २०१८ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती विश्वास यांना, तर प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक अभिनेत्री सुषमा शिरोमणी, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मराठी सिनेमा जगभर पोहचवणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना निफ सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला. रावसाहेब थोरात सभागृहात गुरुवारी (दि.२२) सायंकाळी या सोहळ्याप्रसंगी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर कुसाळकर, मृदुला कुसाळकर तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, दिग्दर्शक संदीप सावंत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संतोष मंडलेचा, सुहास भोसले, चित्रपट वितरक समीर दीक्षित, माजी आमदार कलावंत बबनराव घोलप, निफ महोत्सवाचे दिग्दर्शक मुकेश कणेरी, सदगुरू मंगेश, राकेश नंदा आदी उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास म्हणाल्या, नव्या कलावंतांनी जास्त मेहनत करायला हवी. पूर्वी काम करताना कलावंतांमध्ये एक ऋणानुबंध होता. आज मात्र कलावंतांमध्ये वैचारिक दुरावा निर्माण झाला आहे. तो दुरावा दूर करत चांगल्या कलाकाराबरोबर चांगले माणूस म्हणून स्वत:ला सिद्ध करावे. या शहराने दिलेल्या प्रेमाचे कायम ऋणी राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महोत्सवाच्या दहाव्या पर्वाचा शुभारंभ जागतिक जल दिनानिमित्त संदीप सावंत दिग्दर्शित ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगने करण्यात आले. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने ‘निफ’ची सुरूवात करण्यात आली. यावेळी गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी, जलयोद्धा राजेश पंडित, निशिकांत पगारे, बालकलाकार भानू आदी उपस्थित होते. सिमरन आहुजा यांनी सूत्रसंचालन केले.
नदी सांभाळण्याचे काम
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात उपस्थित प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपल्या गावातून वाहणारी नदी सांभाळण्याचे काम प्रत्येकाला करावे लागणार असून, त्यावरच शाश्वत विकास शक्य आहे. नद्या वाचवायच्या असतील तर काय करावे लागेल ते ‘नदी वाहते’ या सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक संदीप सावंत यांनी सांगितले. ं

Web Title: Memorial Award for Smriti Biswas NIF Festival: Sushma Shiromani, Varsha Usgaonkar, Gajendra Ahire Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा