इगतपुरी रेल्वेस्थानकात मेगाब्लॉक :  पॅसेंजर, गोदावरी एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:32 AM2018-10-20T00:32:04+5:302018-10-20T00:32:34+5:30

इगतपुरी रेल्वेस्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने मुंबई-भुसावळ, गोदावरी एक्स्प्रेस या दोन गाड्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून, लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावत आहे.

Mega Block in Igatpuri railway station: Passenger, Godavari Express canceled | इगतपुरी रेल्वेस्थानकात मेगाब्लॉक :  पॅसेंजर, गोदावरी एक्स्प्रेस रद्द

इगतपुरी रेल्वेस्थानकात मेगाब्लॉक :  पॅसेंजर, गोदावरी एक्स्प्रेस रद्द

Next

नाशिकरोड : इगतपुरी रेल्वेस्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने मुंबई-भुसावळ, गोदावरी एक्स्प्रेस या दोन गाड्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून, लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावत आहे.  इगतपुरी रेल्वेस्थानकात रूट रिले इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने शुक्रवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. या दोन्ही गाड्या येत्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, तर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस शुक्रवारी भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे पुण्याला रवाना झाली. रविवारपर्यंत हुतात्मा एक्स्प्रेस याच मार्गे अप-डाउन करणार आहे. हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्याने तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने रेल्वेप्रवासी व विशेष करून नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. यामुळे शुक्रवारी लांब पल्ल्याच्या काही रेल्वे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन नियोजन चुकले होते.
दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस शनिवारी दुपारी दोनऐवजी २.५० वाजता दादरवरून सुटणार आहे. तसेच एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस, लक्षद्वीप एक्स्प्रेस, एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेस या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटणार असल्याने एक ते दोन तास उशिराने धावणार आहे.
रविवारी (२१ आॅक्टोबर) एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी १०.५५ ऐवजी एलटीटीवरून दुपारी एक वाजता सुटणार आहे. तर पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, छापरा-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या उशिरा धावतील, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Web Title: Mega Block in Igatpuri railway station: Passenger, Godavari Express canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.