खरीप हंगामपूर्व तयारी बाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 05:39 PM2019-06-19T17:39:16+5:302019-06-19T17:39:29+5:30

जायखेडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत एकलहरे ता. बागलाण येथे खरीप हंगामपूर्व तयारी बाबत परिसरातील शेतकº्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

Meetings regarding kharif seasonal preparations | खरीप हंगामपूर्व तयारी बाबत बैठक

खरीप हंगामपूर्व तयारी बाबत बैठक

Next

जायखेडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत एकलहरे ता. बागलाण येथे खरीप हंगामपूर्व तयारी बाबत परिसरातील शेतकº्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती डी. ए. भामरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील पीक नियोजन, बीज प्रक्रि या महत्त्व, माती व पाणी परिक्षण, मका पिकावरील लष्करी आळीचे एकात्मिक नियंत्रण, कापूस पिकावरील गुलाबी बोड अळीचे नियंत्रण, दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन, पीक विमा, किटकनाशक हाताळणी आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येऊन शेतकर्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी सरपंच चंद्रसिंग सुर्यवंशी, उपसरपंच वसंत अहिरे, पोलीस पाटील योगेश खैरनार, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब खैरनार, देविदास ठाकरे, आदींसह दिलीप जगताप उपस्थित होते. स्वप्निल पगारे, दिलीप अहिरे, नारायण शेवाळे, रवींद्र अहिरे, पंकज खैरनार, बबलू नाडस्कर, प्रकाश जगताप, भगवान जगताप व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Meetings regarding kharif seasonal preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी