राज्य शिक्षक परिषदेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:21 AM2018-12-17T01:21:09+5:302018-12-17T01:21:36+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राज्य व जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक राज्यध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील रुंग्ठा हायस्कूलमध्ये संपन्न झाली.

Meeting of State Teachers' Council | राज्य शिक्षक परिषदेची सभा

महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी.

Next

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राज्य व जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक राज्यध्यक्ष राजेंद्र सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील रुंग्ठा हायस्कूलमध्ये संपन्न झाली.
या सभेत मागील सभेचे इतिवृत वाचून कायम करण्यात आले. संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले. राज्यध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सांगितले, आगामी अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत जुनी पेन्शन लागू करणे हा मुद्दा अग्रक्रमी घेणार आहे. राज्य कोषाध्यक्ष संजय पगार यांनी शिक्षक हिताचा जुनी पेन्शन व चौदावा वित्त आयोग निधीचा मुद्दा मांडला.
सभेस शिक्षक परिषदचे विभागीय कार्यवाह डी. यू. आहिरे, दत्ता पाटील, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के, राज्य कोषाध्यक्ष संजय पगार, राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पगार व मधुकर उन्हाळे, संघटनमंत्री सुरेश दंडवते, शांताराम घुले, अविनाश तारापल्ली, भगवान घरत, भरत मडके यासह सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यवाह उपस्थित होते. सभेच्या यशस्वितेसाठी रमेश गोहिल, राजेंद्र खैरनार, रावसाहेब जाधव, रवींद्र ह्याळीज, गंगाधर पगार, शंकर देवरे, सुभाष बर्डे, आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


सूत्रसंचालन कार्यवाह रमेश गोहिल यांनी केले. आभार रावसाहेब जाधव यांनी मानले.

Web Title: Meeting of State Teachers' Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.